न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२२) :- भुमकर चौकाकडुन चिंचवडकडे फिर्यादी तरुण हा त्याच्या दुचाकीवरून (एम.एच.१२ जे.बी.४३७१) जात होता. प्रतिभा शोरूम येथे त्याच्या समोरून कार आली. कार (एम. एच.१२ जे.बी.४३७१) वरील चालकाने त्याच्या ताब्यातील कार वाहतूकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने, हयगयीने, अविचाराने चालवुन फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिली.
अपघातात फिर्यादीच्या गुडघ्याला, खांदयाला व छातीला मुक्का मार लागला. आरोपी कार चालक घटनास्थळी न थांबता निघुन गेला. गुरूवारी (दि. २४) रोजी सकाळी ९.५० वा. सुमारास ही घटना घडली.
फिर्यादी सचिन सर्जेराव खंडागळे (वय २३ वर्षे, रा. वारजे, जुना जकातनाका, आंबेडकर चौक, दत्त दिगंबर कॉलनी, राजेंद्र हलुंडे यांची रूम, वारजे माळवाडी) याने आरोपी कार (एम. एच.१२ जे.बी.४३७१) चालकाविरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.


















