- प्रत्यक्षात फ्लॅट न देता खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२२) :- निगडी प्राधिकरणातील से. नं. २७ येथे ६,००० स्वे. फुटाचे दोन फ्लॅट घेऊन देण्याचे आरोपींनी फिर्यादीला आमिष दाखवले. सह आरोपी याने फिर्यादीकडून कॉसमॉस बँक, टिळक रोड शाखेत २,८१,५०,००० रुपये घेतले. फिर्यादीकडून दुसऱ्या सह आरोपीच्या मिडीया आयडीया या फर्म बँक अकाउंटवर ८,५०,००० रुपये घेतले, असे एकुण २,९०,००,००० रुपये आरोपींनी फिर्यादीकडून आरटीजीएसद्वारे घेतले. त्याबदल्यात अद्याप फ्लॅट दिलेले नाहीत. फिर्यादी यांनी आरोपीकडे पैशाची वारंवार मागणी केली असता, १३,५०,००० रुपये आरोपींनी परत केले.
उर्वरित २,७६,५०,००० रुपयांची आर्थिक फसवणुक केली. तसेच सह आरोपी याने मोबाईलवरून परत पैसे मागीतले तर आम्ही आमच्या पोलीस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे दाखल करु अशी फिर्यादीला धमकी दिली. हा प्रकार नोव्हेंबर (सन २०१७ ते १७/०८/२०२२) दरम्यान कॉसमॉस बँक, टिळक रोड शाखा, पुणे व प्राधिकरण निगडी येथे ऑनलाईन आरटीजीएसने झाला.
फिर्यादी सोनीत सोमनाथ परदेशी (वय ३८ वर्षे, रा. ए/१ बिल्डींग, फ्लॅट नं. २, शुभम पार्क सोसायटी, से.नं. २६, प्रधिकरण, निगडी) यांनी मयत आरोपी नरेंद्र रामचंद्र शेंगर, (रा. प्लॉट नंबर १६, सेनं. २७, प्राधिकरण निगडी), धर्मा सोनु गोल्हार, (वय ३८ वर्षे रा. वाल्हेकरवाडी, सोमसाई कॉलनी, घर नंबर २, साई मंदिराजवळ, चिंचवडे नगर), अपर्णा अशोक गिरी (रा. अनिकेत सोसा. वसंत बापट चौक, बिवेवाडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.


















