न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२२) :- बळजबरीने फिर्यादीच्या प्लॉटवर आरोपींनी ताबा मारला आहे. तसेच सदरची मिळकत आरोपींच्या ताब्यात असल्याचे ते फिर्यादी यांना सांगत आहेत. या मिळकतीवरील वॉल कंपाऊंड जे.सी.बी (एम.एच/१४/एच. क्यु/८८३९) च्या सहाय्याने पाडुन नुकसान करीत आरोपींनी प्लॉटवर अतिक्रमण केले आहे.
प्लॉटमध्ये गेल्यास फिर्यादीला आरोपी शिवीगाळ करून दमदाटी करीत आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि. २२) रोजी सकाळी ९.०० वा चे सुमारास मौजे वडमुखवाडी येथील सर्व्हे नंबर १६४/१, प्लॉट नंबर ४६/४७ मधील एकुण १८०० चौ.फुट. येथे घडली.
५१ वर्षीय महीला फिर्यादी यांनी आरोपी मिलींद काळुराम लोंढे, भाऊ जिवन काळुराम, त्याची आई तिचे नाव माहीत नाही. (सर्व रा. रा. ११/९, आव्हाण सोसायटी, सेक्टर २१, स्कीम ११, यमुनानगर, निगडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















