न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२२) :- भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे प्रीतम प्रकाश कला वाणिज्य महाविद्यालय, भोसरी येथे “संविधान दिन” साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. अशोककुमार पगारिया यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात “नीतिमूल्ये जपणारे व नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारे जगातील सर्वात मोठे संविधान आहे, हिन्दी व इंग्रजी भाषेत लिहिलेली एकमेव हस्तलिखित राज्यघटना आहे. डाॕ बाबासाहेब आंबेडकर हे या घटनेचे शिल्पकार मानले जातात. घटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मुल्ये घटनेचा आत्मा आहे. आधार आहे ” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ॲड. नेहा लांडगे यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधान असा दस्तावेज आहे की, सर्व भारतीयांचा सन्मान व प्रतिष्ठा याची उंची निर्माण करतो. संविधान व्यवस्था म्हणून उभी राहू शकत नाही परंतु व्यवस्था सुधारण्यासाठी सामान्य नागरिकांनी संविधानातील कलमांचा आधार घ्यावा असे प्रतिपादन केले.
प्रमुख वक्त्या ॲड. शकुंतला काळे यांनी संविधान निर्मितीच्या इतिहासातील अनमोल कार्याची मांडणी केली. तसेच संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत कार्य करणाऱ्या सर्व सदस्यांच्या कार्याचे महत्व स्पष्ट केले. संविधान दिनाचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुधाकर बैसाणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित उबाळे व भारतीय संविधानाच्या सरनामावाचन प्रा. अॕड महालक्ष्मी शिरसाट यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे उपस्थित होते. त्याचप्रमाणे डॉ. विजय निकम, डॉ. हनुमंत शिंदे, प्रा. प्रवीण म्हस्के, प्रा. पांडुरंग भास्कर, प्रा. सचिन पवार, प्रा. उमेश लांडगे, प्रा. प्रशांत रोकडे, प्रा. विभा ब्राह्मणकर, प्रा. रूपाली आगळे, डॉ. स्वाती वाघ, प्रा. राजेश कुंभार, सारिका बेलदोर, मोहिनी पोटभरे, विजय मोहिते, तुषार पाटील, सुहानी बिंद इत्यादींसोबत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कु शिरीन शेख या विद्यार्थिनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.
















