न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२२) :- मॅक्स केअर कुरीज इंडिया प्रा. लि. या चीट फंडच्या मुख्य संस्थापकाने फिर्यादी यांना चीट फंडच्या नावाखाली चांगल्या परताव्याचे अमिष दाखवले. फिर्यादीला आरोपीच्या ऑफिसमधील व्यक्तीकरवी हप्ते भरण्यास भाग पाडले.
फिर्यादीचे आयडीबीआय बँकेचे ३९ चेक स्वीकारुन एकुण ६,६०,००० एवढ्या रक्कमेचा स्वतःच्या फायदयासाठी अपहार करुन फिर्यादीचा विश्वसाघात करुन फिर्यादीची हेतूपुर्वक आर्थिक फसवणुक केली आहे.
हा प्रकार सन २०१६ ते २०१९ च्या दरम्यान फिर्यादीचे ऑफिस शुभ कॉम्पलेक्स, शॉप नं १०,११,१२ प्लॉट नं ६ सेक्टर नं १ इंद्रायणीनगर, भोसरी एमआयडीसी येथे घडला. फिर्यादी शिवजी देवजी पटेल (वय ५५ वर्षे, रा. सेक्टर नं ३, प्लॉट नं ६४/६, हरीओम निवास, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी आरोपी युवराज रणदिवे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
















