न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२२) :- गॅस विक्रीचा व रिफिलिंग कोणताही शासकीय परवाना नसताना धोकादायकरित्या घरगुती गॅस वापराच्या सिलेंडरमधुन छोटया वापराच्या सिलेंडरमध्ये गॅस रिफिलिंग केला. त्यामुळे लोकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका पोहचू शकत होता. गॅससारख्या ज्वालाग्रही पदार्थाबाबत निष्काळजीपणा केला.
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने कारवाई करीत १२,०७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई (दि. २६) रोजी ४.३० वाराघव होमा पैल्नसेस, भगत वस्ती हनुमान मंदीर, भोसरी येथे केली.
आरोपी महेश माधवराव मोरे (वय २८ वर्षे, रा. सोमनाथ लांडगे यांचे रूममध्ये, हनुमान नगर, भगत वस्ती, भोसरी) याच्या विरोधात जिवनाश्यक वस्तु कायदा १९५५ क. ३,७ सह एल.पी.जी (पुरवठा व वितरण नियमन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















