न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२२) :- सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी संचालित सिंबायोसिस ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स, किवळे आणि पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ “माध्यम प्रायोजक” सहयोगाने १, २ आणि ३ डिसेंबर २०२२ रोजी ” सिंम्बी उत्सव २०२२ ” चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालय किवळे या ठिकाणी भरवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमधील अंगभूत आणि अंतर्निहित कौशल्ये सुधारण्यासाठी आंतरशालेय आंतर महाविद्यालय, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामध्ये इयत्ता ९ वी, १० वी, ११ वी आणि १२ वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार “सिंम्बी उत्सव २०२२” विषयी बोलताना म्हणाल्या की, “शैक्षणिक उपक्रमांबरोबरच सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालय सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील बढावा देते. महाविद्यालयातील विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. नृत्य, गायन, अभिनय तसेच क्रीडा अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तर मिळतोच तसेच विज्ञान प्रश्नमंजुषा आणि प्रदर्शन या माध्यमातून मनोरंजनात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांना संशोधन, आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सुधारण्यास मदत होते. या उत्सवाचे संपूर्णपणे नियोजन विद्यार्थ्यांकडून होते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थापनकौशल्य वाढीस लागते.”
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीविषयी माहिती देताना डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की, “सिंबायोसिस ज्युनियर कॉलेज तर्फे विद्यार्थ्यांना फॉरेन लँग्वेज क्लास, कॉन्फिडन्स बिल्डिंग क्लास, सॉफ्ट स्किल्स क्लासेस, लीडरशिप डेव्हलपमेंट स्किल क्लास इ. विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच सुसज्ज प्रयोगशाळा आणि उत्कृष्ठ कॅम्पस असलेल्या सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मध्ये सिंबायोसिस ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी इन हाउस कोटा देखील उपलब्ध आहे.”
सिम्बिओसिस ज्युनिअर कॉलेज च्या प्राचार्या सौ. भावना नरसिंगोजु यांनी सिम्बि उत्सव २०२२ या सोहळ्याबद्दल विस्तृत माहिती दिली व या सोहळ्यात सहभागी होण्या आंमत्रित केले. सिंम्बी उत्सव २०२२ मध्ये सिंम्बी ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने रन फॉर कॉज हा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच टग ऑफ वॉर स्पर्धा, बॉक्स क्रिकेट, आणि झुंबाचे आयोजन करण्यात आले आहे. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती मिळावी म्हणून विज्ञान प्रश्नमंजुषा आणि प्रदर्शन आणि फनफेअरचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये फॅशन शो, गायन, नृत्य समूह नृत्य, ओपन माइक इत्यादी विविध कार्यक्रमाचा अंतर्भाव असणार आहे. सिंम्बी उत्सव २०२२ मध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमाची विस्तृत माहिती https://symbiosisircollege.ac.in/ संकेत स्थळावर उपलब्ध आहे