न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२२) :- वाकड येथील मुंबई बेंगलोर हायवे, मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर फिर्यादी यांचे वडिल पायी चालत होते. दरम्यान अज्ञात वाहनाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन त्यांना धडक देवुन गंभीर जखमी केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना (दि. १९) रोजी १:२० वाजण्याच्या सुमारास वाकड ब्रिजखाली घडली. वडिलांच्या मुत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी फिर्यादीचा मुलगा बी सुब्बारेडडी (वय ३५ वर्ष, रा-मयुरी पी जी, मुक्ताईनगर, हिंजवडी, मुळ- रा. पापीरेडडी पक्कीगांव, एस ए के एन मंडक, कडाप्पा, आंध्रप्रदेश) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.