- वृद्ध महिलेच्या अंगावरील सोनं घेऊन चोरट्याचा पळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ डिसेंबर २०२२) :- मुलाला वडापाव घेवुन जाण्यासाठी फिर्यादी महिला गल्लीत आल्या असता त्या एका अनोळखी इसमाने ” तुम्ही दिवाळीला कपडे खरेदी केले होते, त्याचे तुम्हाला अडीच तोळे सोने बक्षीस लागले आहे, तुम्ही माझ्याबरोबर मावळ मार्टमध्ये चला, माझे हिरो होंडाचे दुकान आहे ” असे म्हणाला.
फिर्यादीने त्यांच्या मुलाकडे इसमाला नेले आणि ‘ मावशीला माझ्याबरोबर पाठवा ‘ असे फिर्यादीच्या मुलाला म्हणत इसमाने फिर्यादीला मोटार सायकलवर बसवुन नेले. फिर्यादीकडे तुमच्या जवळचे सोने काढुन दया, त्याची कच्ची रिसीट बनवतो, तुमचे सोने तुम्हाला परत करतो, मग तुम्हाला बक्षीस मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादी महिलेने अंगावरील अंदाजे साठ हजारांचे दोन तोळे सोने (गळ्यातील माळ व अंगठी) काढून दिली.
” मी लगेच सराफाच्या दुकानात जावुन रिसीट बनवतो. तुम्ही येथेच थांबा, मी परत येतो असे बोलून फिर्यादीचा विश्वासघात करून सोने घेवुन गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २६) रोजी सायं. ५. ३० वा. दरम्यान तेळी आळी, तळेगाव दाभाडे येथे घडली. ७२ वर्षीय महिला फिर्यादी यांनी अनोळखी इसमाविरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.