न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ डिसेंबर २०२२) :- टाटा एसीई कंपनीच्या (एम.एच १२ एल.टी. ३३७९) छोटा हत्ती या वाहनावरील अनोळखी चालकाने वाहन हयगयीने, भरधाव वेगात चालवले. फिर्यादीच्या वडीलांना पाठीमागुन धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले.
घटनास्थळी आरोपीने फिर्यादीच्या वडीलांना उपचारासाठी कोणतीही मदत न करता पलायन केले. ही घटना (दि. ३० /११/२०२२) रोजी १२.०० वा.चे सुमारास फुलेनगर, गियर कंट्रोल कंपनीच्या गेट समोर, चिंचवड येथे घडली.
फिर्यादी मंगेश सुर्यकांत जगताप, (वय ४२ वर्षे, रा. सर्वे नं १३७, मंगेश निवास, खिंवसरा कंपाऊंड जवळ, रामनगर, चिंचवड) यांनी आरोपी छोटा हत्ती टाटा एसीई कंपनी (एम.एच.१२/एल.टी ३३७९) वरिल अनोळखी चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















