न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ डिसेंबर २०२२) :- बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकल्याप्रकरणी पालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य पथकाने जाधववाडीतील गजानन क्लिनिकला ३५,००० दंड ठोठावला.
तसेच बंदी असतानाही प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याप्रकरणी दोन आस्थापनांना प्रत्येकी ५,००० प्रमाणे १०,००० रुपये आणि डास उत्पती केंद्र तयार केल्याबाबत १ आस्थापानास २,००० रुपये अशी एकूण ४७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई क्षेत्रिय अधिकारी आण्णा बोदडे, सहा. आरोग्यधिकारी तानाजी दाते यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवालं, आरोग्य निरीक्षक संजय मानमोडे, क्षितिज रोकडे व वैभव घोळवे यांच्या पथकाने केली.