न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ डिसेंबर २०२२) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आतिष बारणे यांच्या वतीने मोशी प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांना पंढरपूर व अक्कलकोट या तीर्थक्षेत्राची यात्रा घडविण्यात आली. या यात्रेमध्ये ८०० भाविकांचा सहभाग होता. यामध्ये आबाल वृद्धांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. पंढरीच्या विठुरायाच्या व अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाने भाविक भारावले. आतिश आनंदराव बारणे यांनी आयोजित केलेल्या यात्रेत प्रत्येक भाविकाची योग्य अशी सोय करण्यात आली होती. यामध्ये भोजन तसेच उत्कृष्ट प्रकारचे नियोजन करण्यात आले. सर्व भाविकांनी त्यांच्या या नियोजनाचे कौतुक केले.
अतिश बारणे म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या प्रभागातील नागरिकांना पंढरपूर व अक्कलकोट या तीर्थक्षेत्राची यात्रा घडविली. यात्रेत सर्व भाविकांसाठी योग्य असे नियोजन केल्यामुळे भाविकांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली त्यामुळे मी स्वतः भारावून गेलो आहे. माझ्या प्रभागाच्या विकासासाठी तसेच माझ्या प्रभागातील रहिवाशांसाठी नेहमीच कटीबद्ध असणार आहे.
प्रभागातील नागरिकांना वेगवेगळ्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी अग्रेसर आहेत. या यात्रेच्या निमित्ताने प्रभागातील नागरिक एकत्र येतील. तसेच त्यांना तीर्थक्षेत्रांची यात्रा व विठुरायाची व स्वामी समर्थांचे दर्शन घडावे, या हेतूने यात्रा आयोजित करण्यात आली होती, असे अतिष बारणे यांनी सांगितले.