न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ डिसेंबर २०२२) :- हिंजवडी आणि देहूरोड पोलिसांनी अमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करण्याच्या तयारीतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
त्यातील पहिली कारवाई हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (दि. १) रोजी दुपारी १.४५ वा. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील मुकाईनगर येथे केली. आरोपी गोपाळ कृष्णाराम खिलेरी (वय ४० वर्षे, रा. मुकाईनगर, श्याम वाकडकर यांच्या रुममध्ये भाडयाने, हिंजवडी, मुळ गाव – लोहावत, तहसिल फलोदी, पोलीस स्टेशन लोहावत, जिल्हा जोधपुर, राजस्थान, दिनेश बिष्णोई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १२,००० रुपये किंमतीचा मोबाईल, ४,९६५ रुपये किंमतीचा ३३१ ग्रॅम इतका डुडा अफु वनस्पतीची सुकवलेल्या बोंडांचा चुरा (पॉपि स्ट्रॉ), ६,००० रुपये किंमतीचा आफिम व ५५,००० रुपयांची काळ्या रंगाची होंडा शाईन गाडी, असा एकुण ७७,९६५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी डुडा अफु वनस्पतीच्या सुकवलेल्या बोंडांचा चुरा (पॉपि स्ट्रॉ) व आफिम एका जणाकडून आणल्याचे तपासात सांगितले.
दुसरी कारवाई देहूरोड अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी (दि. ३०/११/२०२२) रोजी दुपारी ५.३५ वा. चे सुमारास देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीत किवळे येथील मुकाई चौक, बसस्टॉप शेजारी, दख्खन चहाच्या दुकानासमोरल रोडच्या कडेला केली. आरोपी अमली पदार्थ विक्रीच्या तयारीत असतानाच पोलिसांनी आरोपींना कब्जात घेतले. आरोपी अविनाश भाऊ आव्हाड (वय २३ वर्षे, रा. किवळेगाव, मराठी शाळेच्या पाठीमागे, मंगल वाघमारे यांचे खोलीमध्ये भाडयाने, देहुरोड), गणेश रविंद्र जाधव (वय २३ वर्षे रा. दत्तनगर तरसवस्ती, देहुरोड), पाहिजे आरोपी चिक्या (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही रा. खडकवासला) अशी आरोपींची नावे आहेत. देहूरोड पोलिसांनी आरोपींकडून ७८० ग्रॅम वजनाचा गांजा, रोख रक्कम, लोंखडी चॉपर, दोन मोबाईल, एक हिरो कंपनीची एच एफ डिलक्स (एम.एच.१४ एचएक्स १८१४) दुचाकी असा एकूण ८६,००० रु. किंमतीचा माल जप्त केला आहे.