न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ डिसेंबर २०२२) :- स्वतःच्या लग्नासाठी फिर्यादी महिलेने माळी वधुवर सुचक मंडळात नावाची नोंदणी केली. दरम्यान आरोपीने फिर्यादीच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. त्यांना लग्न जमण्यासाठी येणा-या अडचणी दुर करण्यासाठी पुजा अर्चा करावी लागेल, असे भासवले.
पूजा अर्चा करण्यासाठी आरोपीने वेळोवेळी फिर्यादीकडुन पैशाची मागणी करत १२,१७,१२० रुपये रक्कम घेतली. आरोपीने रकमेचा अपहार करीत फिर्यादीची अर्थिक फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते आजपर्यंत गणेश हौसिंग सोसायटी, हनुमाननगर, ताम्हाणेवस्ती, चिखली येथे घडला. ३६ वर्षीय महिला फिर्यादी यांनी चिखली पोलीस ठाण्यात आरोपी विशाल शर्मा (रा. जोहारीपुर, उत्तराखंड, पुर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















