- पिंपरी कॅम्पात बड्या व्यवसायिकांविरोधात गुन्हा दाखल...
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ डिसेंबर २०२२) :- स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपींनी टी शर्ट, ट्रॅक पँट व जॅकेट यांना पुमा कंपनीचा बनावट लोगो व लेबल लावून आभास निर्माण केला.
हे बनावट टी शर्ट, ट्रॅक पँट व जॅकेट असा एकूण १०,९९,००० रूपये किंमतीचा माल आरोपींनी आर. जे. सेल्स, (शॉप नं. १६ गौतम ऑप्टीशियन समोर, पिंपरी कॅम्प), सतनाम ट्रेडर्स (संजय लॅबररी गल्ली गणपती मंदिरासमोर, पिंपरी कॅम्प), पॅराडाईस मेन्स वेअर (सी ब्लॅक, ३/९ पिंपरी कॅम्प) जीटी कलेक्शन (रौनक हॉटेल जवळ पिंपरी कॅम्प) गुरूकृपा ट्रेडर्स (रौनक हॉटेल जवळ पिंपरी कॅम्प) या दुकानांमध्ये विक्रीकरीता ठेवला.
हा प्रकार (दि. १) रोजी दुपारी ४.३० ते रात्री ९.३० वाजता उघडकीस आला. फिर्यादी दिलीपकुमार राधेशाम स्वर्णकार (वय ३९ वर्षे, सम्राट अशोक नगर, नेहरुनगर सोसायटीच्या विरुध्द बाजुस, आर. सी. मार्ग, चेंबुर कॉलनी, मुंबई) यांनी आरोपी राहुल सुरेश जयसिंगांनी (वय २९ वर्ष, रा. ब्लैक नं.ए/७०३ रोझ आयकॉन पिंपळे सौदागर), रोजेश टेकचंद जयसिंघानी (वय ५२ वर्ष, रा. २०१/बी बिल्डींग आदी रिजन्सी काळेवाडी), दिलीप नेनुमल खतीजा (वय ५२ वर्ष रा. १०/१६, ब्ली ब्लैक पिंपरी कॅम्प), राजेश गुरूदासमल तेजवानी (वय ५२, रा. प्लॉट नं. बी-७ साई एन्क्लेव्ह निरंकारी भवन जवळ काळेवाडी), धीरज किशोर जयसिंगांनी (वय ३१ वर्ष, रा. एस-३ लाईफ स्टाईल सोसायटी फ्लॅट नं.८०३, सी बिल्डींग, पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपींना सीआरपीसी ४१ (अ) (१) ची नोटीस दिली असून कॉपीराईट अॅक्ट सन १९५६ चे कलम ५१, ६३, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















