न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ डिसेंबर २०२२) :- चिंचवडच्या एसकेएफ इंडीया लिमीटेड या कंपनीत ६/४/२०२० ते ६/१०/२०२२ दरम्यान आरोपी डेप्युटी मॅनेजर प्रशासन आणि सुविधा या पदावर कामास होता. आरोपीने पदाचा गैरवापर करुन कंपनीचा विश्वासघात केला.
कंपनीच्या एचएसबीसी बँकेच्या क्रेडीट कार्डव्दारे ४८,५७,२७९.५५ रुपये इतक्या रकमेचा स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी अपहार करून कंपनीची फसवणुक केली.
फिर्यादी रोहन रामचंद्र फडके (वय ३८ वर्षे, रा. सिल्वर स्कायस्केप अपार्टमेंट, बी ४०४, वाकड यांनी आरोपी योगेश मोहनराव भोसले (वय ३७ वर्षे रा. भोसले हाईटस, स.नं.१९/८, रत्नदीप कॉलनी, डांगे चौक, थेरगांव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.