न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ डिसेंबर २०२२) :- औरंगाबाद येथील फिर्यादीच्या लहानपणी गल्लीत राहणाऱ्या आरोपीने फेसबुकवरुन फिर्यादी महिलेचा मोबाईल नंबर मिळवला. फोनवरून फिर्यादी महिलेशी ” माझ्याशी बोल, मला तुला भेटायचे आहे ” असे म्हणत सतत फोन करुन त्रास दिला.
फिर्यादी महिलेचा पाठलाग करीत त्यांच्या मुलांच्या शाळेपर्यंत आला. वारंवार त्यांना भेटण्यासाठी बोलावुन व फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे बोलून फिर्यादी महिलेचा मानसीक छळ केला. तसेच दुर्लक्ष केले तर औरंगाबाद येथील फिर्यादीची आई आणि महिलेच्या मुलांसह कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार दिड महिन्यापासुन ते (दि. १) रोजीपर्यंत सुरु आहे. ४२ वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी राकेश गंगाधर जाधव (वय ४३ वर्षे, रा. सुभश्री कॉलनी, सिडको एन ५, औरंगाबाद) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.