न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ डिसेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आस्थापनेवरील सन २०२०-२०२१ मधील रिक्त २१६ पोलीस शिपाई पदाच्या भरतीकरीता आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे (दि. ०९.११.२०२२ ते ३०.११.२०२२) या कालावधीत स्विकारण्यात येणार असल्याबाबत (दि. ०९/११/२०२२) रोजीच्या वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात आले होते.
उमेदवारांना आवेदनपत्र भरण्याबाबत येत असलेल्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने आवेदनपत्र भरण्याकरीता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई पदाच्या भरतीकरीता आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे भरण्याची अंतिम मुदत (दि. १५/१२/२०२२) अशी राहिल. पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी (दि १५/१२/२०२२) रोजीपर्यंत आवेदन अर्ज संगणकीय प्रणालीद्वारे सादर करावेत, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे.