न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ डिसेंबर २०२२) :- धुम्रपान करण्यासाठी फिर्यादी घटनास्थळी थांबले होते. तेव्हा पांढ-या रंगाच्या स्वीफ़्ट गाडीतील (गाडीचा क्रमांक माहीत नाही) आरोपी दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या अंगावर विनाकारण बिअरची बाटली फेकली.
त्याबाबत फिर्यादीने आरोपी अनोळखी इसमांना जाब विचारला. त्या उलट आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ अनं दमदाटी केली. फिर्यादीच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडुन व त्याच फुटलेल्या बाटलीने फिर्यादीच्या गळयाजवळ मारून फिर्यादीला गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी जवळ असलेला १०,००० किंमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढुन नेला.
ही घटना (दि २) रात्री १.१५ वा. चे सुमारास सचिन वाईन्स शेजारी, पान टपरीजवळ, ब्रिज खाली, देहुरोड येथे घडला. फिर्यादी अदित्य कृष्णा सोनवणे (वय २१ वर्ष, रा. ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेट, देहुरोड) याने आरोपी दोन अज्ञात इसमांविरोधात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.