न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०२२) :- ऑनलाईन ट्रेडींगमध्ये फिर्यादी यांनी ७,००० रुपये गुंतवले. फिर्यादी यांना त्याचा परतावा ९,१०० रुपये त्यांच्या आयसीआयसीआय बँक खात्यावर परत मिळाला. त्यांनी पुन्हा ३३,००० रुपये रक्कम गुंतवली. त्याचे ४२,९०० परत त्यांना मिळाले. त्यांनंतर तिस-यांदा रक्कम १,३०,००० रक्कम गुंतवली असता टेलीग्रामवरून मेसेज आला. तुमचा परतावा तुम्हाला अधिक मिळण्यासाठी तुम्ही आणखीन जास्तीत जास्त रक्कम गुंतवा. म्हणजे तुमचा अर्थिक फायदा जास्त होईल. फिर्यादी यांनी त्यांच्या सांगण्यावरुन पुन्हा कंपनीमध्ये ऑनलाईन रक्कम रुपये २, ४०,००० गुंतवले.
त्यानंतर तुमची कालची परताव्याची संपुर्ण रक्कम ही ५,३०,००० रुपये झाली आहे. ती रक्कमही आम्हाला तुमच्या खात्यावर पाठविण्याकरीता आणखीन तुम्ही २,५५,००० रुपये भरणे अपेक्षीत आहे. तुम्हाला पुन्हा रक्कम रुपये ३,००,००० भरावे लागतील. फिर्यादी यांनी शेवटी रक्कम भरली नाही, रक्कम परत मागितली असता ती आरोपींनी त्यांना दिली नाही. फिर्यादीची ८,७५,००० रक्कम ऑनलाईन पध्दतीने व्याजाचे आमिष दाखवत आर्थिक फसवणुक केली.
हा प्रकार (दि. ३०/११/२०२२) रोजी २.३० वाजताचे दरम्यान आश्रवदीप निवास, सुमीत फुड बाजारच्या बाजुला, लेन नंबर १, समर्थनगर, नवी सांगवी येथे घडला. फिर्यादी प्रवीण श्रीरंग शिंदे (वय ४० वर्षे, समर्थनगर, नवी सांगवी) यांनी आरोपी इझी लाईफ कंपनी (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















