- जड, अवजड वाहनांना पुलावरून जाण्यास वाहतूक शाखेची बंदी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०२२) :- महावीर चौकातून चिंचवडगावाकडे जाणारा रेल्वे उड्डाणपूल बंद करण्यात येणार आहे. चिंचवड स्टेशन येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे.
महावीर चौकातून चिंचवडगावाकडे जाणारा जुना रेल्वे पूल हा कमकुवत झाला असल्याचे त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. महावीर चौकाकडून चिंचवड गावाकडे जाणाऱ्या जड, अवजड वाहनांना या पुलावरून जाण्यास वाहतूक शाखेकडून बंदी करण्यात आली आहे. यात पीएमपीएमएल बसचा देखील समावेश आहे. या मार्गावरील जड, अवजड वाहने, पीएमपीएमएल बसेस महावीर चौकातून खंडोबा माळ-भक्ती शक्ती येथून बिजलीनगर- रिव्हर व्ह्यू मार्गे इच्छित स्थळी जातील.
हा बदल रविवार (दि. ४) पासून करण्यात आला आहे. अवजड वाहन चालकांनी या मार्गावरून वाहने न नेण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. याबाबत वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सतीश माने यांनी आदेश दिले आहेत.


















