न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसेंबर २०२२) :- बस पार्क करीत असताना रस्त्यावरील तीन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या बसमुळे अपघात झाला, असा बनाव रचला. फिर्यादीस मारहाण केली. फिर्यादीच्या खिशातील २२,००० रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम १५०० रुपये जबरदस्तीने काढुन घेत गॅरेजमधील कॉम्प्रेसर मशीनचे फोडुन नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.४) रोजी सायं ७:०० वा. चे सुमारस दुर्गानगर जवळील सीएनजी पंपाच्या आतील बाजुस व तरवडे गॅरेज, चिंचवड येथे घडला. फिर्यादी सिध्दार्थ चंद्रकांत ठोसर (वय २८ वर्षे, रा. यशवंतनगर, टेल्को कंपनीमागे, चिंचवड) यांनी तीन अनोळखी आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.















