न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. ४ मार्च) :- पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील होटेल मोशी ग्रॅंड येथे रविवार (दि. ३) रोजी वाको महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन, महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. संतोष मात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वाको महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र प्रदेशच्या चेअरमनपदी उद्योजक संतोष बारणे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील २९ जिल्हे ११ महापालिका क्षेत्रातील सर्व अध्यक्ष व सदस्य यावेळी उपस्थित होते. किक बॉक्सिंग हे भारतातील २६ राज्य ४ केंद्रशासित प्रदेश, जगभरातील १८९ देश या असोसिएशनशी संलग्न असून, निरनिराळ्या स्पर्धेत सहभागी होत असतात.

यावेळी बारणे म्हणाले की, ”साधारण भारतातील १८ ते २० लाख खेळाडू व महाराष्ट्रातील ७५ हजारच्यावर खेळाडू या असोसिएशनतर्फे खेळत आहेत. हया महाराष्ट्र किक बाॅकसिंग असोसिएशनच्या चेअरमनपदी माझी निवड झाली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.”











