न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२२) :- जैन २० वे तीर्थंकर ही लोककल्याणकारी भूमी असून हजारो वर्षांपासून येथे दरवर्षी कोट्यवधी भाविक येतात. या तीर्थक्षेत्राला झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. जैन समाजाच्या या पवित्र तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ बनवून प्रतिष्ठा आणि या यात्रेचे महत्त्व संपणार आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज बुधवारी (दि. २१) रोजी संपूर्ण भारतासह पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही जैन समाजाने आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत.
आचार्य भगवंत श्री हर्षसागरजी महाराज साहेब यांची बैठक झाली. त्यात पिंपरी-चिंचवडमधील १२०० हून अधिक बंधू-भगिनी उपस्थित होते. शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास जैन समाजातर्फे कडक पावले उचलण्यात येतील, असा इशारा सरकारला बैठकीत देण्यात आला.
यावेळी रमेश सोनिगरा, कांतीलाल पारेख, भरत सोळंकी, महावीर जैन, मनीष सोनिगरा, दिलीप सोनिगरा, अंकित पुनमिया, दीपक चोपडा, नीलेश जैन, मनोज श्रीश्रीमल व पिंपरी-चिंचवड सकल जैन समाज, पिंपरी-चिंचवड जैन महासंघ, पिंपरी-चिंचवड जैन स्थानकवासी व तेरापंथ संघ, पिंपरी-चिंचवड समुह, पिंपरी-चिंचवड सकल जैन समाज, पिंपरी-चिंचवडमधील सर्व ट्रस्टचे बंधू-भगिनी उपस्थित होते.
















