न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२२) :- ” तू माझ्या सांगण्याप्रमाणे वाग, माझ्यासोबत रहा, माझ्यासोबत बोल, जर तसे केले नाही तर, माझ्याकडे हत्यार असून मी तुला व तुझ्या नव-याला मारून टाकीन ” अशी धमकी आरोपीने फिर्यादीला दिली.
फिर्यादीच्या अंगावरील कपडे काढून फिर्यादीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने मनाई केल्याने त्याने फिर्यादीशी अतिप्रसंग न करता अश्लील फोटो काढले. पोलीसांना सांगितले तर फोटो फिर्यादीच्या नवऱ्याला पाठविण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीचे फोटो आरोपीने फिर्यादीच्या व्हाटसअपवर पाठवले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.२०) रोजी ५.०० वा. सुमारास थरमॅक्स चौक, रामनगर, निगडी येथे घडली. २३ वर्षीय महीला फिर्यादी यांनी आरोपी मानतेष सिद्धू यतनाळकर (रा. थरमॅक्स चौक, रामनगर निगडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी फिर्याद दिली आहे.
















