न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२२) :- पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आरोपींनी संगनमत करीत फिर्यादी महिलेच्या गळ्यातील ८०,००० रूपये किमतीचे २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन पदर असलेले मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले आहे.
हा प्रकार (दि.२०) रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास हेरंब अपार्टमेंट, या सोसायटीच्या गेटसमोर हृदय हॉलच्या पाठीमागे, सेक्टर ४, मोशी प्राधिकरण येथे घडली.
५६ वर्षीय महीला फिर्यादी यांनी आरोपी दोन अनोळखी इसम (अंदाजे वय २० ते २५ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















