- जमावावर कोयता उगारत केली दहशत; दिघीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- एका महिण्यापुर्वी फिर्यादीने आरोपीच्या कानाखाली मारली होती. याचा राग आरोपीच्या मनात होता. दरम्यान फिर्यादी व फिर्यादीचा मित्र ओमकार अमितवाड हे घरी जात असताना आरोपी चौघेजण मोटार सायकलवर आले. फिर्यादी व ओमकार अमितवाड यांना अडवुन शिवीगाळ करीत हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.
आरोपीने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या उजव्या खांदयावर व कमरेच्या दोन्ही बाजुला वार करुन गंभीर जखमी केले. तसेच सह आरोपीने फिर्यादीच्या नाकावर बुक्की मारुन नाकाचे हाड फॅक्चर केले. इतर दोन आरोपी यांनी फिर्यादीला हातातील चैनीने मारहाण करीत जखमी केले. तसेच ओमकार अमितवाडला आरोपी व सह आरोपी यांनी त्यांच्या हातातील कोयता व सत्तुर मारुन जखमी केले. मदतीसाठी जमलेल्या लोकांना बोलावले असता आरोपी यांनी हातातील हत्यार उगारुन नागरीकांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली व परीसरात दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हि घटना (दि. २२) रोजी सायंकाळी ७.०० वाजता सावंतनगर कमानीजवळ, दिघी येथे घडली. फिर्यादी श्रेयस सुनिल गाढवे (वय २१ वर्षे, रा. रुनं. २०३. श्रीराम कॉलणी, मॅगझीन चौकाजवळ, गजानन महाराज नगर, दिघी) यांनी आरोपी अर्जुन वाघमोडे, ओमकार गाढेकर, राम देवकाते, अनिकेत लोहीरे (रा. दिघी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.


















