न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित एलबीटी इंग्लिश मीडियम स्कूल आणि श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालयचे २८ वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले.
या कार्यक्रमाची सुरुवात बाबा स्वामी योगा ग्रुपचे सुरेश विटकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर, मोहन तापकीर, माजी नगरसेविका अनिता तापकीर, सोमनाथ तापकीर, युवा नेते सागर तापकीर, नेताजी नखाते, नंदकुमार सातुर्डेकर, एकनाथ काटे, दत्तात्रय भुजबळ, सुखदेव खेडकर, राजेंद्र पवार, संतोष पानसरे, संतोष काळभोर, नितीन पवार, डॉ. अजय जाधव, प्रकाश मुरकुटे, नंदकिशोर गिरमे, माधव दंडीमे सुरेश पाटील, दिलीप वढणे, रामकिशन वढणे, संदीप जांभळे, शांताराम भोंगाले, अशोक हजारे आदी उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनात दोन्ही विद्यालयांच्या पहिली ते दहावी इयत्तेमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अनेक मराठी व हिंदी चित्रपटातील गाण्यांवरती आपले नृत्य कला सादर केली. पालकांनीही आपल्या विद्यार्थ्यांच्या कलेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू बल्लाळ आणि माधुरी केदारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता दोन्ही विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार कोयल सातपुते यांनी मानले.