न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२२) :- अॅडवीक हॉय-टेक प्रा. लि. कंपनीत तयार केलेले ५२८० अॅल्युमिनीयमचे ब्रेक लिव्हर १० बॉक्समध्ये सिलबंद होते. एस.सी.सी. कारगो ट्रान्सपोर्टमधील टाटा एस (एम.एच.१४ ई. एम. ०५०१) या गाडीवरील चालकाच्या ताब्यात विश्वासाने फिर्यादीने इन्वहॉइससह माल दिला.
हा माल चिंबळी फाटा येथील कंपनीच्या गोडावूनमध्ये घेवुन जाण्यास सांगीतले. परंतु, आरोपीने त्याच्या इतर सहकाऱ्यांसह ४७,८६१ रूपये किमतीचे एकुण १९३० ब्रेक लिव्हरचा स्वता:च्या फायद्यासाठी अपहार केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १९) रोजी रात्री ८.३७ वा. ते (दि.२०) रोजी दुपारी १२.०० वा. दरम्यान वासुली फाटा, खेड येथे घडली. फिर्यादी प्रकाश निशिकांत गनबोटे (वय ४२ वर्ष रा. घर न.८९, कात्रज कोंढवा रोड, गल्ली नं.५, न्यु पुणा बेकरी जवळ, कात्रज) यांनी आरोपी बालगीर आनंद गिरी (वय २७ वर्ष, रा. कुरुळी ता. खेड, पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.















