न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२२) :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रामधील देखभाल व दुरुस्ती कामकाज केले जाणार आहे.
स्थापत्य देखभाल व दुरुस्ती विभागामार्फत गुरुवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे एमआयडीसी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच, शुक्रवारी ३० डिसेंबर २०२२ रोजी पाण्याचा पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी फुगेवाडी, निगडी, सी.एम.ई., आर ॲण्ड डी दिघी, व्ही.एस.एन.एल., कँटोन्मेंट बोर्ड, ओ.एफ.डी.आर. या भागातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
















