न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२२) :- पुणे-मुंबई महामार्गावरील आकुर्डी खंडोबा मंदिराची बुधवारी (दि. २८) आणि गुरुवारी (दि. २९) रोजी जत्रा आहे. त्यामुळे येथील वाहतुकीत वाहतूक विभागाकडून बदल केला आहे.
थरमॅक्स चौकाकडून येणारी वाहतूक ही आर. डी. आगा मार्गाकडून गरवारे कंपनी कंपाऊंडपर्यंत येऊन तेथील टी जंक्शनवरून खंडोबामाळ चौकाकडे न जाता ती डावीकडून परशुराम चौकाकडून मोहननगर, चिंचवड मार्गे इच्छित स्थळी जातील. परशुराम चौकाकडून येणारी वाहतूक ही खंडोबामाळ चौकाकडे न येता ती परशुराम चौकातून आर. डी. आगा मार्गे गरवारे कंपनी कंपाऊंड पर्यंत येऊन टी जंक्शन वरून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील. चिंचवड, दळवीनगर व आकुर्डी गावठाणातून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकाकडून थरमॅक्स चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून वाहने ही टिळक चौक/ शिवाजी चौक बाजूकडे वळून इच्छितस्थळी जातील. टिळक चौकाकडून येणाऱ्या वाहनांना खंडोबामाळ चौकातून थरमॅक्स चौक बाजुकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत असून ही वाहने सरळ चिंचवड स्टेशन/दळवीनगर मार्गे इच्छितस्थळी जातील. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील केले आहे.
















