न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२२) :- सातारा जिल्ह्यातील वडूज नगरपंचायतचे मुख्याधिकारी अमित पंडित यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासन अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने जारी केला आहे.
महापालिकेमध्ये प्रशासन अधिकारी पद रिक्त होते. त्यानुसार अमित पंडीत यांची पिंपरी पालिकेच्या प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पंडित यांच्याकडे प्रशासन अधिकारी पदासह ब क्षेत्रीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभारही सोपविण्यात आला आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी आदेश काढला आहे.


















