न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२२) :- माहेराहून हुंडा आणला नाही, तसेच फिर्यादी पिडीत महिला काम करीत नाही, सकाळी उशीरा उठते, असे घालुन पाडुन बोलुन व फिर्यादींवर संशय घेवुन त्यांना वेळोवेळी शिवीगाळ व हाताने मारहाण करुन फिर्यादी यांचा शारीरीक व मानसीक छळ केला. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २०/०५/२०२२ पासुन दि. २९/१०/२०२२) पर्यंत गायकवाड यांची रुम, वाकवस्ती, हडपसर, पुणे व मॅझीन चौक, दिघी येथे घडली.
फिर्यादी महिला यांनी आरोपी अक्षय विश्वनाथ जामले (वय २७ वर्ष), विश्वनाथ परवती जामले (वय ५५ वर्ष), महिला आरोपी (वय ४८ वर्ष रा. गायकवाड यांची रुम, वाकवस्ती, हडपसर, पुणे मुळ. अहमदनगर) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















