- अनं सामान ट्रान्सपोर्टमध्ये अडकल्याची बतावणी करीत एकाची लुट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२२) :- फेसबुक मार्केटमध्ये फिर्यादीने जाहीरात पहिली. त्यात आरोपी सीआयएफ मधील अधिकारी असुन त्यांची बदली झाल्याने घरातील सामान विक्री करायचे आहे. तसेच सामानाचे फोटो देखील टाकले होते. त्याद्वारे फिर्यादी व आरोपीची मोबाईलवरून ओळख झाली. आरोपीने फिर्यादी यांना सामान पाठविले असुन ते ट्रान्सपोर्टमध्ये अडकले आहे ते पुढे पाठविण्यास सांगत सह आरोपीचा मोबाईल क्रमांक दिला. फिर्यादी यांनी रक्कम रूपये १८००० पाठवली. रक्कम स्वीकारून देखील आरोपीने सामान पाठविले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ३१/०७/२२) रोजी सकाळी ११.०० ते रात्री ९.०० वा दरम्यान फिर्यादीच्या रहात्या घरी, देहूगाव येथे घडली.
फिर्यादी विकास मुकुंद निकम (वय ३१, रा. तथास्तु पॅराडॉईज, ए-विंग फ्लट नं ४०१, कंद पाटील नगर, क्रमांक ११, देहूगाव) यांनी आरोपी सिमीत कुमार (मो क्र ७७३५१२५८७२२), श्रीकांत सिंग (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही मो नं ९६९२३८६४२९) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















