- एकाची ह्युंदाई कंपनीची कार ढापली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२२) :- ह्युंदाई कंपनीची आय २० कार (एम एच १४ ई यु ८४६०) ही कंपनीत लावतो, असे फिर्यादीच्या ओळखीच्या आरोपी व्यक्तीने फिर्यादीला सांगितले. महिना २५ हजार रुपये मोबदला देतो असे आमिष दाखविले. आरोपी फिर्यादीची कार घेवुन गेला व त्या बदल्यात पैसे न देता फिर्यादीची गाडी १ वर्षापासुन वापरीत आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि २०/११/२०२०) रोजी २.०० वा नाशिक फाटा चौक, कासारवाडी येथे घडला.
फिर्यादी आशिष नरसिंह वेलानी (वय ४१ वर्षे, रा. फ्लॅट नं. ६०४, सी विंग, सप्तर्षी रेसीडन्सी, वाल्हेकरवाडी) यांनी आरोपी अजयकुमार गिरी (वय ४० वर्षे रा. मुंबई) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















