न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२२) :- टॅम्पो चालक (एमएच १४ जीयु ३६२२) आरोपी हा एका व्यक्तीसह आरकोएआरएस ट्रान्सपोर्ट येथे माल खाली करून फुरसुंगी, हडपसर येथून पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेने सोमाटणे गावच्या हद्दीत आला. त्यावेळी आरोपीच्या टेम्पो समोरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाला आरोपीच्या टेम्पोने (दि. २१) रोजी रात्री १.०० वाजेच्या सुमारास पाठीमागुन जोरात धडक दिली.
या अपघातामध्ये टेम्पोमध्ये बसलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्यातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सुनिल एकनाथ पाचगे (वय ३५ वर्षे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत व्यक्तीच्या मरणास आरोपी कारणीभूत ठरला.
फिर्यादी शिरगांव परंदवडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार यांनी आरोपी समीर पापाभाई सय्यद (रा. उर्से ता. मावळ) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शिरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















