- रहाटणी, नखाते वस्ती, सज्जनगड कॉलनी, कुणाल हॉटेल परिसर लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२२) :- नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी- चिंचवड शहरातील गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्याची हद्द असलेल्या रहटणीतील रहाटणी फाटा ते नखाते वस्ती, सज्जनगड कॉलनी, स्वामी विवेकानंद स्कूल, कुणाल हॉटेल तसेच पिंपळे सौदागर येथे मध्यरात्री एकूण २० ते २२ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
कोयते आणि सिमेंट च्या गट्टूनी वाहनांची तोडफोड केल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. टोळक्याला अडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अज्ञातांनी धक्काबुकी केली असून ते रिक्षातून फरार झाले आहेत.
शनिवारी ३१ डिसेंबर असल्याने शहरात दीड हजारापेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त होता. तरी देखील अज्ञात चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिक्षातून येऊन दिसेल त्या दुचाकी, चारचाकीला लक्ष करत कोयत्याने आणि सिमेंटच्या गट्टूने वाहनांची तोडफोड केली आहे. तोडफोड करणाऱ्या टोळक्याला पकडण्याचा प्रयत्न वाकड पोलीस कर्मचाऱ्याने केला पण त्यांना धक्काबुकी करून अज्ञात तोडफोड करणारे व्यक्ती पसार झाले आहेत.















