न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२२) :- इन्स्टाग्रामवर आरोपी व फिर्यादीची ओळख झाली होती. तेव्हापासून इन्स्टाग्रामवरुन आरोपीने फिर्यादीचे फोटोंचे स्क्रीनशॉट काढले. वारंवार फिर्यादीस भेटण्यासाठी बोलवले. इन्स्टाग्राम व व्हॅटसअॅपवर मेसेज करून फिर्यादीच्या प्रायव्हेट पार्टचे फोटो पाठवून शरीरसुखाची मागणी केली. फिर्यादीचा वारंवार पाठलाग केला.
भेटण्यासाठी नाही आल्यास फोटो सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देत फिर्यादीस शिवीगाळ केली. फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सन २०२० पासून ते दि. ३०/१२/२०२२ रोजीपर्यंत आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे घडला. महिला फिर्यादी यांनी आरोपी अतुल निरंजन यादव (वय ३१ वर्षे, रा. जमेथा, जि-जोनपूर राज्य- उत्तरप्रदेश) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.















