न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२२) :- कारला दुचाकी आडवी लावुन आरोपींनी फिर्यादीचा रस्ता अडवला. फिर्यादीला संगनमताने मारहाण करुन बळजबरीने त्यांच्याकडील ५५,००० रु. किं.ची ११ ग्रॅम वजनाची गळयातील सोन्याची चैन, ३०,००० रु. किं.ची सॅमसंग गॅलक्सी ओ ५३ मॉडेलचा मोबाईल असा एकूण ८५००० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. तसेच कारच्या (एम.एच. १९ ए.एक्स. ९५९८) समोरील व पाठीमागील काचा दगड मारुन फोडुन नुकसान केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १) रोजी दुपारी २.०० वा. चे दरम्यान राजमुद्रा प्रतिष्ठाण वाचनालय, महेशनगर, पिंपरी येथे घडला.
फिर्यादी मायकल डॉमनिक फर्नाडिस (वय-३१ वर्षे, रा. स.नं-४५२/२५०१ महेशनगर, पिंपरी) यांनी आरोपी गणेश विश्वकर्मा (वय-२७ वर्षे, रा. महेशनगर, पिंपरी), शुभम जाधव (वय २८ वर्षे), निलेश पाटोळे (वय २७ वर्षे), एक अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


















