- काळेवाडीतील घटना; सहाजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२२) :- एकाच शाळेत आरोपी, जखमी शुभम चव्हाण, फिर्यादीसह त्यांची मैत्रीण शिकत आहेत. आरोपीने फिर्यादीस मैत्रिणीबरोबर का बोलला? या कारणावरून जखमी शुभम चव्हाण व फिर्यादी यास शिवीगाळ केली. त्याच्या साथीदारांना फोन करुन बोलवुन घेतले. फिर्यादीला हाताने लाथाबुक्क्यांने, दगडाने मारुन गंभीर जखमी केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ३०/१२/२०२२) रोजी ११.३० वा. सुमारास शाळेच्या समोर, एम.एम. स्कुल, डी मार्ट जवळ, काळेवाडी येथे घडली.
फिर्यादी मयुर किरण पाटील (वय २० वर्षे, रा. सी/ओ, देवकर, बळीराज कॉलणी, रहाटणी) यांनी आरोपी संकेत अशोक लोखंडे (वय २० वर्षे अंदाजे रा. यशोदा कॉलणी, नखाते नगरच्या कमानीसमोर, रहाटणी), सचिन तुकाराम शिंगे (वय २३ वर्षे, अंदाजे रा. गोडांबे बिल्डींग जवळ, नखातेनगर, रहाटणी), अक्षय राजु खताळ (वय २१ वर्षे, अंदाजे रा. सोनगिरा ज्वेलर्स शेजारी, रहाटणी), ओंकार आबासाहेब पांडुळे (वय २१ वर्षे अंदाजे, रा, गोंडाबे बिल्डींग नं. १०१, रहाटणी), भरत मुकुंदा चोधरी (वय १९ वर्षे अंदाजे, रा. यशदा कॉलनी, रहाटणी), करण परमेश्वर गवाडे (वय १९ वर्षे अंदाजे, रा. शिवशंभो सोसा. थेरगाव) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
















