- शहर मनसेकडून पालिका आवारात आंदोलन; स्मरणपत्र देऊन केली आठवण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात जवळपास २ वर्षाहून अधिक काळ ‘दिवसाआड’ पाणी पुरवठा सुरु आहे. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला, परंतु आजतागायत तो लागू आहे. प्रशासनाची अडचण समजून शहरातील नागरिकांनी पालिकेस सहकार्य केले. परंतु आता पाणीपुरवठा नियमित सुरु करा, या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने महापालिका आवारात आज सोमवारी (दि. २) रोजी आंदोलन करण्यात आले.
तसेच आयुक्तांना स्मरण पत्र देत तत्काळ नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. तसेच लवकरात लवकर चिखली पाणीपुरवठा प्रकल्प देखील सुरु करावा अन्यथा मनसेला पुढील काळात कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला.
यावेळी पाणी पुरवठा अधिकारी टकले यांनी निवेदन स्वीकारत आयुक्तांबरोबर चर्चा करुन चिखली पाणीपुरवठा प्रकल्प लवकर सुरु करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात शहराध्यक्ष सचिन चिखले अश्विनी बांगर, महिला शहराध्यक्ष, सीमा बेलापूरकर, महिला शहर सचिव, संगीता देशमुख उपाध्यक्ष, विद्या कुलकर्णी, विशाल मानकरी, राजू सावळे, चंद्रकांत दानवले, रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, मयूर चिंचवडे, सुशांत साळवी, नितीन सूर्यवंशी, शिवकुमार लोखंडे, तुकाराम शिंदे, अमर माळी, नितीन चव्हाण, राजू भालेराव, राजेश अवसरे, श्रद्धा देशमुख, कैलास दुर्गे, निलेश नेटके, कृष्णा महाजन, सुरेश सकट, विशाल उकिरडे, सोनू भोसले, ॲलेक्स आप्पा मोजेस, नारायण पठारे, शिशिर महाबळेश्वर कर, रोहित काळभोर, मंगेश भालेकर, रोहित थोरात, बाळा शिवशरण, आशिष शेलार, सागर शिंदे, जय सूर्यवंशी, आकाश सागरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
















