न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) :- शहरात प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात एकूण २,१४२ बस आहेत. यातील ११३० बस ठेकेदाराच्या, तर १०१२ बस पीएमपीच्या स्व:मालकीच्या आहेत. शहराची वाढती लोकसंख्या पाहता या बसची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
या नवीन वर्षात पुणे शहरात मुंबईच्या धर्तीवर डबल डेकर बस सुरू करता येतील का, या संदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या बैठकीत या संदर्भातील प्राथमिक चर्चा झाली.
तुलनात्मक उत्पन्न, वाहतूक पोलिसांचे म्हणणे याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल. सध्या ही चर्चा प्राथमिक स्तरावरच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डबल डेकर बस पुण्यात सुरु करण्याबाबतच्या प्राथमिक चर्चेत, मुंबईत डबल डेकर बस धावत आहेत. कारण तिथल्या पायाभूत सुविधा पुण्यापेक्षा वेगळ्या आहेत. आम्ही मुंबईमधील बेस्टसोबत यासंदर्भात चर्चा करणार आहोत. या बस पुण्यासह, पिंपरी चिंचवडमध्ये किती यशस्वी होतील यासाठीचा एक अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर ठोस निर्णय घेतला जाणार आहे.
– ओमप्रकाश बकोरिया, व्यवस्थापकीय संचालक…
















