- तब्बल दोन वर्षानंतर तरूणावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) :- डेक्कन समृध्द जिवन प्रा. ली या कंपनीमध्ये कामास असताना फिर्यादी व आरोपी यांची ओळख झाली होती. फिर्यादी या त्यांच्या राहत्या घरी एकटयाच असताना आरोपी हा फिर्यादीच्या घरी आला. ‘ माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे ‘ असे बोलून फिर्यादीकडे शारीरीक संबधाची मागणी केली. त्यास फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपीने फिर्यादी यांच्या ईच्छेविरुध्द त्यांच्याशी बळजबरीने शारीरीक संबंध केले. घटनेबाबत कोणाला सांगीतले तर त्याचे गंभीर परिणाम फिर्यादी यांना भोगावे लागतील अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि.१०/०९/२०१८) रोजी रात्री १०.०० वा ते सन २०२० (नक्की तारीख व महीना आठवत नाही) चे दरम्यान पीडब्युडी कॉलनी, पहिला मजला, फ्लॅट नं ७, बाराबंगला, यांत्रीकी भवनच्या मागे, दापोडी येथील फिर्यादीच्या राहत्या घरी घडली.
३१ वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी आरीफ अय्युब शेख (वय ३१ वर्ष रा. सर्वे नं ५१, फ्लॅट नं ९०, धानोरी रोड, मज्जित जवळ, भैरवनगर, विश्रातवाडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















