न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) :- रामनगर येथील अनुष्का वॉशिंग सेंटर येथे काम करणाऱ्या फिर्यादीच्या पाठीवर ब्लेड मारून जखमी केले. ” पोलीस स्टेशन येथे जावुन सोन्या काळे, अर्जुन गायकवाड व त्याच्या मित्रांनी मला कोयत्याने मारले, असे खोटे सांग; नाहीतर तुला मारून, तुला नोकरीवरून काढून टाकेन, ” अशी धमकी दिली.
ही घटना (दि. १) रोजी सायंकाळी ६.४५ वा. घडली. फिर्यादी करण बाळू ससाणे (वय १८ वर्ष, रा. दत्तनगर, शिव एंटरप्रायझेस शेजारी, रामनगर चिंचवड) यांनी आरोपी रोहन खरे (वय २२ वर्षे, रा. महात्मा फुलेनगर, बुध्द विहाराजवळ, मोहननगर, चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















