न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) :- साफसफाई करण्याच्या बहाण्याने मोलकरणीने फिर्यादीच्या राहत्या घरातील बेडरुममधील टेबलवर ठेवलेली फिर्यादीची सोन्याची डायमंड असलेली पिवळया रंगाची १८ कॅरेट ३.०५६ ग्रॅमची २,०९,०२८ किंमतीच्या अंगठीतील डायमंड चोरला. अंगठीचे नुकसान करुन सोसायटी गेटच्या आतमध्ये टाकुन दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.३१/१२/२०२२) रोजी सकाळी १०.३० वाचे दरम्यान सी/५०२, ग्रीनलँड सोसायटी, एसएनबीपी इंटरनॅशनल शाळेसमोर, रामबाग कॉलनी, रहाटणी येथे घडला. ३६ वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी महिलेविरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















