न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) :- वडमुखवाडी येथील दिघी पोलीस स्टेशन समोरील पुलावर आरोपीने केटीएम (एमएच १४ जेएफ ७३५८) ही दुचाकी आळंदीकडे जाताना निष्काळजीपणे भरधाव वेगाने, रस्त्याच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन चालविली. रस्ता वळणाचा आहे हे माहित असुनसुध्दा त्याने वेगास आवर घातला नाही.
अपघात होऊन स्वतःला गंभीर दुखापत करून घेतली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दुचाकीच्या पाठीमागे बसलेला बसवराज पतन शेटी (वय २८ वर्षे) यालाही गंभीर दुखापती केली.
दुचाकीचे नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. १) रोजी रात्री १२.४० वाजता घडली. आशिष पुरणलाल केळकर (वय ३० वर्षे रा. काटेवस्ती, कॉ. नं. ४, च-होली) असे मयत आरोपीचे नाव आहे. दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















