न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) :- लाईट बिल रेग्युलर अपडेट करण्याचा बहाणा करीत आरोपीने (मोनं.८९१८१०४२०५) या नंबरचा वापर करुन एमएसईबी ऑफीसमधुन बोलत असल्याचा खोटा बनाव रचला. तसेच फिर्यादीला क्विक सपोर्ट नावचे बोगस अॅप डाउनलोड करण्यास सांगुन फिर्यादी यांच्या पत्नीचा फोन हॅक केला. त्यातील फिर्यादीच्या पत्नीच्या अकाउंटमधुन आणि फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या जॉईट खात्यातुन आणि फिर्यादी यांच्या एसबीआय बँकेमधील फिक्स डिपॉझिट खात्याचा ऑनलाईन पासवर्ड चोरला. फिर्यादी आणि त्यांची पत्नीच्या बँकेतील एकुण ९०,५१० रुपयांची फसवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १६/१०/२०२२) रोजी २.०० वा चे सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी, कमलनयन बजाज स्कुलजवळ, चिंचवड येथे घडली.
फिर्यादी वी. क्रिष्णमुर्ती (वय ७३ वर्षे, सुखवस्तु, रा. आर एल १६, जी के ब्लॉक, एमआयडीसी, कमलनयन बजाज स्कूलजवळ, चिंचवड) यांनी आरोपी अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















