- म्हाळुंगे येथील प्लॅश कंपनीतील घटना; आरोपी गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२२) :- महाळुंगे येथील प्लॅश कंपनीत फिर्यादी हे सुपरवायझर म्हणुन नोकरीस आहेत. आरोपी हा त्या कंपनीमध्ये कामाला आहे. फिर्यादी यांनी सकाळी ११.३० च्या सुमारास आरोपीला कामावरून घरी पाठविले. त्याचा राग मनात धरून (दि. ३) रोजी सायं ७.४५ च्या सुमारास आरोपी कंपनीच्या गेटसमोर येवुन थांबला. फिर्यादी यांनी त्यास ‘ तु कशासाठी थांबला आहे ‘, असे विचारले.
तेव्हा त्याने त्याच्या हातातील पिशवीमधील कोयता काढुन फिर्यादीच्या हातावर वार केला. त्यावेळी फिर्यादी कंपनीमध्ये पळुन जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग करून कोयत्याने त्यांच्या पाठीवर वार करून जबर दुखापत केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी विकास आजाबराव चव्हाण (वय ३२ वर्षे, रा. कारपा, पोस्ट गिरोलीता मानोरा, जि. वाशीम, सध्या रा. व्दारकासिटी ए ६ फलॅट नं ४१, मंदार दामले यांच्या फलॅटमध्ये महाळुंगे) यांनी आरोपी सुरजकुमार रामदुल्हारे (रा. महाळुंगे, मुळ रा. कानपुर, ता. उननाव, जि. लखनौ, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात चाकण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
















