- भोसरीतील पवार क्लिनिकमधील घटना; पोलिसांकडून आरोपीला बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२२) :- क्लिनीकमध्ये येत ” भेंचोद मला आताचे आता १० हजार रुपये दे, नाहीतर तुझे काही खरे नाही ” अशी पेशंटला आरोपीने शिवीगाळ अनं दमदाटी करीत दहशत माजवुन पैशांची मागणी केली.
त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला नकार दिला असता, आरोपीने फिर्यादीच्या क्लिनीकच्या दरवाजाची काच फोडुन क्लिनीकमधील सीझर हातामध्ये घेत फिर्यादीच्या दिशेने रोखुन ‘ मी पहिलेसुध्दा हाफमर्डर केलेला आहे व ३२६ पण दाखल आहे तुला माहित नाही काय ‘ अशी जिवे ठार मारण्याची धमकी देवून पैशांची मागणी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ३) रोजी रात्री ८. ३० वा.चे सुमा डॉ. पवार क्लिनीक, दिघी रोड, भोसरी येथे घडली. फिर्यादी डॉ. रामदास शिवराम पवार (वय ५३ वर्षे, रा. एलॅक्सिस, फ्लॅट नं. सी-११०३, स्पाईन रोड, मोशी) यांनी आरोपी सोपान निवृत्ती गवळी (वय ३५ वर्षे, रा. सर्वे नं. २१३, दिघी रोड, सँडविक कॉलनी, भोसरी) याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.















