न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२२) :- लहान मुलींना शोधण्यासाठी फिर्यादी या त्यांच्या बहीण्याच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा घरामध्ये फिर्यादीचे मेहुणे एकटेच होते, त्यांनी फिर्यादी आल्याचे पाहुन फिर्यादीला आतमध्ये बोलावुन घेतले. फिर्यादीचा हात धरून फिर्यादीला ‘ तुला तुझा नवरा सोडुन गेला आहे, आता तुला माझ्याशिवाय कोण आहे, तु माझ्या सोबत रहा ‘ असे म्हणत फिर्यादीसोबत अश्लील कृत्य करीत फिर्यादीचा विनयभंग केला.
फिर्यादी पळुन जात असताना फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये झटापटी झाली. त्यात आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या अंगठयाला चावा घेतला. फिर्यादीचे केस ओढुन व फिर्यादीच्या पोटामध्ये लाथा मारून फिर्यादीला जखमी केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २) रोजी सायं. ६.०० वा. दवबिंदु सोसायटीच्या बाजुला, सोळंकी चाळमध्ये, सुसगाव ता. मुळशी येथे घडला. २८ वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी नागनाथ रमेश ढोक (वय अंदाजे ३३ वर्ष, रा. सुसगाव) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.















